Friday, June 12, 2009

सावरकर भवनचा वापर विद्यार्थी वर्गासाठी ?

सल्ला ( फुकट चा ! )

पुणे पत्रकारामाधे वादाग्रस्ता ब्लॉग शिवाय आणि एका विषयाची चर्चा आहे। ते म्हणजे सावरकर भवन येथील ( जुने पत्रकार भवन)

या जागेचा वापर विधायाक कामासाठी केला जावा याबाबत पत्रकार बांधवांच्या भावना तीव्र आहेत। या भावना लक्षात घेउन ए़क विधायक कल्पना पुढे आली आहे। त्यात विद्यार्थी आणि भावी पत्रकार यांचे इंटेरेस्ट 'क्लब' होऊ शकतात.

पुणे येथे बाहेर गावावरून येणार्‍या विद्यार्थी वर्गाची संख्या मोठी आहे। पत्रकारितेत करियर घडवण्यासाठी येणारे तरुण लोक पण आहेत। यातील काही लोक हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतात। त्यांच्यासाठी पुण्यात राहणे एक मोठी समस्या आहे। या विद्यार्थ्यांसाठी भवनचा वापर केला जाउ शकतो। एखाद्या दोन विद्यार्थ्यांना या जागेत राहण्याची सोय करता येणे शक्या आहे का हे तपासून पाहता येऊ शकते। नाहीत तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका म्हणून या जागेचा वापर केला जाउ शकतो. त्यासाठी गरजू मुले कशी निवडावी याचे निकष पण ठरवता येऊ . हवे तर विद्यार्थ्याकडून नाममात्र शुल्क ही आकारता येऊ शकते।

आपला विनम्र

ला वा डोके।

1 comment: