काही काळापूर्वी पुण्यातील 'मिडिया' बद्दल लिहिणारा ब्लॉग म्हणुन चर्चेत आलेल्या ब्लॉगच्या मालकाला ( man ला ) पोलिसी खाक्याचा अनुभव आल्याचा कळतय. या निरर्थक कुरापतीपायी ब्लॉगरला नुकतीच पोलिसी हवा खावी लागली. ब्लॉगर ने काही आक्षेपार्ह्य लिखाण (?) केल्याने त्यांना पोलीस आयुक्तालयात ही हवा खावी लागली! या ब्लॉगरने तथाकथित मर्यादा ओलांडून (?) लिखाण केले आणि एका प्रतीथयश संस्थेच्या वरिष्ठ पदावरील लोकांवर टिका केली म्हणुन त्याला पोलिसी चोकशीला सामोरे जावे लागले असेही कळते.
सदर ब्लॉगर आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून, थेट त्या संस्थेतील वरिष्ठ पदावरील लोकांच्या कार्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याने, संस्थेने प्रकरण गंभीरतेने घेतले असे बोलले जात आहे. त्याच गंभीर भूमिकेतून ब्लॉगरला जब विचारण्याचे संस्थेने ठरवले, पण त्या आधीच तो ब्लॉग बंद करण्यात आला.
एका इंग्रजी वृत्तपत्राचा पुण्यातील एकमेव 'man' प्रतिनिधी असणा-या ब्लॉगरची प्रतिमा यापुर्वीही 'लोकांच्या खासगी आयुष्याची गोसिपिंग करत फिरणारा' अशी होती, असे त्या ब्लॉगर चे निकटवर्तीय सांगतात.
पोलिसी धक्क्याने भाम्बवालेला हा ब्लॉगर आता प्रकरण मिटावे यासाठी संस्थेच्या मागे लागल्याचे समजते.
भूमिका 'डोक्याची मंडई' ची:
ला वा डोके, हे जरी व्यक्ति आणि लिखाण स्वातंत्र्याचे प्रचारक एंड पुरस्करते असले, तरी मिळालेल्या स्वातंत्र्या गैरवापर करू नये अशी त्यांची भूमिका आहे. याच भूमिकेतून त्यांनी ही डोक्याची मंडई चालू केली आहे. या भूमिकेचा ही पुनरुच्चार ते कायम करत रहणार आहेत. ब्लॉगर मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर माहिती आणि बतामिची देवाण घेवाण यासाठी व्हावा अशी ही भूमिका आहे. काय म्हणता ?
असो, कटावे परी लोभ असावा !
आपला
ला वा डोके.
Tuesday, June 2, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
it is unfortunate to find that people in pune media believe that punemedia blogger did something very offensive.
ReplyDeleteinfact, the blog was an excellent and pioneering example for pune media people. we all must encourage such acts. blogging is not a crime, it is a mean to express thoughts. that is what punemedia did...